Contractual Basis Appoint : राज्यातील आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधनात तब्बल 10000 हजार रुपयांची भरघोस वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी देखील समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील तासिका निदेशकांनी नोव्हेंबर महिन्यात आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते. त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
$ads={1}
तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देण्यासाठी सरकारचा निर्णय!
कंत्राटी निदेशकांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये मानधनावरून आता 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे. आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधन वाढीच्या निर्णयानंतर आता या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित/ कायम करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कंत्राटी शिल्पनिदेशक यांना नियमित करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देणेबाबत मागणीच्या अनुषंगाने समिती गठीत करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षीत व अनुभवी निदेशक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वेळोवेळी भरतीची कार्यवाही करण्यात येते.
तथापि, तातडीच्या प्रसंगी व भरतीच्या कार्यवाहीस लागणाऱ्या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणाचे नुकसान होवू नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून प्रशिक्षणाकरीता तासिका तत्वावर तासिका निदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.
तासिका तत्वावर व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम तासिका निदेशक अविरतपणपणे करीत आहेत. त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत तासिका निदेशक कंत्राटी पद्धतीने नियुक्तीची मागणी वारंवार करीत आहेत, या मागणीकरीता त्यांनी दि.३०/१०/२०२३ ते ०३/११/२०२३ या कालावधीत आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील तासिका तत्वावरील निदेशकांच्या मागणीच्या अनुषंगाने या तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती देणेबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत सरकारचा दिलासादायक निर्णय!
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेजन करा - निरंजन डावखरे
$ads={2}
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न