Contract Staff Regularization : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन विविध जिल्ह्यास्तरावर महिन्याभरापासून सुरु केले होते, आता याबाबत हिवाळी अधिवेशनात विधानसभा अतारांकित प्रश्नामध्ये कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत (Contract Staff Regularization) माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
$ads={1}
आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न
राज्यातील धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध जागांवर पदभरती होणार असून, या जागांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (National Health Mission) कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिकेतील शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धुळे येथे आंदोलन केले असल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०२३ रोजी निदर्शनास आले आहे.
सदर मागणी लक्षात घेता धुळे महापालिकेत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून (Contract Employees Regularization) घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? याबाबत विधानसभा अतारांकित प्रश्न माननीय सदस्य श्री. कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) यांनी उपस्थित केला होता.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत सरकारकडून अतारांकित प्रश्नावर खुलासा
शासनाकडील दि. १४.०२.२०२३ रोजीच्या पत्रान्वये विविध संवर्गातील एकूण १२६ (गट अ, ब, क, व ड) ही रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबत आस्थापना खर्चाची अट शिथील केलेली आहे. सदर पदांमध्ये आरोग्य विभागातील एकूण ५ पदांचा समावेश आहे.
तथापि, सदरचे १२६ पदे वगळता इतर संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के केलेली आहे.
धुळे महानगरपालिकेचा सन २०२२-२३ चा आर्थिक वर्षाचा आस्थापना खर्च ४८.९२ टक्के आहे. सदरचा आस्थापना खर्च ३५ टक्केपेक्षा जास्त असल्यामुळे NUHM अंतर्गत मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम मंजूर व रिक्त पदावर सेवेत सामावून घेणे शक्य होणार नाही, असे धुळे महानगरपालिकेने कळविले आहे. असे मा. मुख्यमंत्री यांनी अतारांकित प्रश्नावर खुलासा केला आहे. (अतारांकित प्रश्न येथे डाउनलोड करा)
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर
आरोग्य विभागातील दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांवर सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी सरळसेवेने 70% व उर्वरित 30% पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा जास्त सलग सेवा झालेल्या कंत्राटी (तांत्रिक / अतांत्रिक) कर्मचाऱ्यांचे समायोजनाकरीता वयाची अट शिथिल करणे तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरीता सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक ते बदल आणि दुरुस्ती करुन अभियानातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात (Regularization of Contract Employees) शासन स्तरावर निर्णय घेण्याकरिता दिनांक 7 नोव्हेंबर 2023 च्या पत्रान्वये शासनास प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार हा प्रस्ताव विचाराधीन असून, पुढील कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.
कंत्राटी आरोग्य सेविकांचे समायोजन करण्याबाबत - अतारांकित प्रश्न
खुशखबर! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
$ads={2}
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 'या' रिक्त पदांसाठी भरती सुरु
कंत्राटी पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन, संदर्भात सरकारकडून खुलासा