NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन या रिक्त विविध पदांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 'या' रिक्त पदांसाठी भरती सुरु
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी रत्नागिरी याचेतर्फे उमेदवारांकडून खालील पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावे.
पदाचा तपशील आणि पगार
- Medical Officer - 17 (MBBS-60000/- (BAMS-25000/-٠ Max Incentive 15000/-)
- Entomologists - 9 (40000)
- Public Health Specialist - 9 (35000)
- Lab Technician - 18 (17000)
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण नमुद करावे.)
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला/आधार कार्ड.
- शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्ययावत नुतनीकरण)
- जात प्रमाणपत्रची साक्षांकित प्रत
अर्ज करण्याची पद्धत
- इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात A 4 आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजुस टंकलिखीत अथवा मुद्रीत करुन सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा.
- लिफाफयावर पदाचे नाव व युनिटचे/कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमुद करावे.
- एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज शुल्कासह सादर करावेत.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. व राखीव प्रर्वगातील उमेदवारांनी रु.१००/- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने (फोन पे/जीपे/युपीआय/इंटरनेट बॅकिंग / मोवाईल बँकिंग) ने जाहिरातीमध्ये दिलेल्या ID किंवा नावाने जमा करावयाचे आहे. अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रक्कमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज अपात्र करण्यात येईल.
- उमेदवारांनी दि.२६/१२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प.रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या लिंक
महत्वाचे - पदभरती विषयक पुढील सर्व सुचना जिल्हयाच्या संकेतस्थळावर https://ratnagiri.gov.in & https://zpratnagiri.org प्रसिद्ध करण्यात येतील, याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार मेला जाणार नाही.
$ads={2}
NHM मूळ जाहिरात, अर्जाचा A 4 नमुना , अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे डाउनलोड करा