Contract Workers : राज्यातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नासंबंधी विधानसभेत दिनांक 20 डिसेंबर रोजी लक्षवेधी मांडण्यात आली होती, यावर सरकारकडून कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी माहिती देताना महत्वाची घोषणा केली आहे.
$ads={1}
महत्वाची बातमी! कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत विधानसभेत सरकारची घोषणा
कंत्राटी कामगारांना नियमित वेतन (Regular Salary) मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले.
कंत्राटी कामगारांना (Contract Workers) नियमित कामगारांप्रमाणेच सक्षम कारणाशिवाय कामावरून कमी करू नये, तसेच कामावरून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जावी आदी बाबींसंदर्भात संरक्षण देणारे विधेयक (Bill) आणण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सदस्य प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, कंत्राटी कामगार हा कायमस्वरूपी नसल्याने त्याला आवश्यकतेनुसार कामावरून काढता येऊ शकते. तथापि त्यासाठी सक्षम कारण असणे आवश्यक आहे. अशा कामगारांना कामावरून कमी करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत संबंधित कंपन्यांना सूचित केले जाईल.
कामगारांना भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) दिला आहे किंवा नाही याची शासनामार्फत पडताळणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
#विधानसभालक्षवेधी
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 20, 2023
कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील. कामगारांना उचित कारणाशिवाय कामावरून कमी करू नये व कमी करण्यापूर्वी नोटीस द्यावी आदी बाबींसंदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल - मंत्री @DrSureshKhade #महाहिवाळीअधिवेशन२०२३ pic.twitter.com/eZ8ZWaRLqd