Anganwadi Sevika News : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी ताजी बातमी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे, या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात विधानसभेत मा. मंत्री श्री गिरीश महाजन आणि मा. यशोमती ठाकूर यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली. सभागृहातील याबाबतचा व्हिडिओ तुम्ही या लेखाच्या शेवटी पाहू शकता.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सभागृहात जोरदार चर्चा
राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांना वाढीव मानधनाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत मा. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना (Anganwadi employees) शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून त्याप्रमाणे वेतनश्रेणी (Pay Scale), महागाईभत्ता (DA), रजा व इतर भत्ते आणि इतर महत्वाच्या मागण्यासाठी आंदोलन सुरु असून, दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी विधानसभेत याबाबत मा. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनाबाबत मुद्दा उपस्थित केला होता. सभागृहातील याबाबतचा व्हिडिओ पहा.
अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ
राज्यात 81 हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी 3500 तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन 4 हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरून 5525 रुपये वाढ करण्यात आली आहे. सदर मंजूर करण्यात आलेली मानधन वाढ माहे एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
आदिवासी विभागातील कंत्राटी कर्मचारी झाले नियमित
आनंदाची बातमी! राज्यातील अंगणवाडी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे दोन महत्वपूर्ण निर्णय!