Anganwadi News : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ताजी बातमी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi employees) विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात विधानपरिषद माननीय सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, याबाबत सरकारतर्फे सन्माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे.
$ads={1}
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य करणेबाबत - तारांकित प्रश्न
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना (Anganwadi employees) शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून त्याप्रमाणे वेतनश्रेणी (Pay Scale), महागाईभत्ता (DA), रजा व इतर भत्ते देण्यात यावेत यासाठी दिनांक ४ ऑक्टोबर, २०२३ रोजी वा त्यासुमारास राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
तसेच, राज्यात ८३ हजार अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व तितक्याच मदतनीस व १३ हजार मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत असून, त्यांना कमी मानधन व ते देखील वेळेत मिळत नसल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर मानधन व त्यात वाढ करण्यासह त्यांच्या विविध अन्य मागण्या मान्य करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याबाबत माननीय विधानपरिषद सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खालीलप्रमाणे खुलासा केला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये माहे एप्रिल, २०२३ पासून वाढ करण्यास शासन निर्णय दिनांक ०३.०४.२०२३ अन्वये मान्यता दिलेली आहे.
सदर वाढ विचारात घेऊन माहे एप्रिल, २०२३ पासून मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन PFMS प्रणालीद्वारे नियमित वेळेत अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते.
तसेच अंगणवाडी कर्मचारी यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी संघटनांसमवेत वेळोवेळी बैठक आयोजित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित
$ads={2}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सभागृहात जोरदार चर्चा, सभागृहातील व्हिडिओ पहा