Anganwadi Employees Retirement Age GR : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची तारीख ठरली
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा ३० एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
सबब, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक ३०.११.२०१८ व दिनांक ०२.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
- ज्या अंगणवाडी कर्मचा-यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्म दिनांक १ जानेवारी ते दिनांक १ मे (दोन्ही दिवस धरून) या कालावधीतील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे.
- ज्या अंगणवाडी कर्मचा-यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दिनांक २ मे ते दिनांक ३१ डिसेंबर (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे. (शासन निर्णय)