Anganwadi Sevika News : राज्यातील अंगणवाडी ताई/सेविकांच्या विविध मागण्यासंदर्भात नुकतीच मंत्रालयात दिनांक 29 नोव्हेंबर रोजी महत्वाची बैठक संपन्न झाली, या बैठकीत राज्यातील 3 हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळणार असून, इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली सविस्तर वाचा..
$ads={1}
राज्यातील 3 हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळणार, इतर महत्वाच्या विषयावर चर्चा
राज्यातील अंगणवाडी ताईंना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दि. 29 नोव्हेंबर 2023 मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार कपिल पाटील यांना दिले आहे.
या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी 3 हजार मिनी अंगणवाडी यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे मान्य केले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यासाठी हा निर्णय धोरणात्मक असून, मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच हेल्थ इन्शुरन्सचा (Health Insurance) खर्च शासनाकडून भरण्याचे , थकीत बिलं तातडीने देणे, अंगणवाडी ताई यांना दर्जेदार मोबाईल देणे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे देखील या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मान्य केले आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित होते. आमदार कपिल पाटील आणि पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारती यांच्या पुढाकाराने झालेली ही बैठक अंगणवाडी ताईंसाठी दिलासादायक आहे, असे मत मायाताई म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित,नियुक्ती पत्रांचे वाटप
आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळासोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, पूर्व प्राथमिक (Anganwadi) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
$ads={2}
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य करणेबाबत - तारांकित प्रश्न
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेजन होणार?