Contractual Employees Regular In Government Service : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी नैमित्तिक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम नेमणुकीची नियुक्ती पत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम दिनांक 30 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाला.
$ads={1}
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित
बेस्ट (BEST) उपक्रमातील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना उपक्रमात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी नैमित्तिक कर्मचारी (Casual Employees) आणि त्यांच्या संघटना सातत्याने करीत होत्या. या अनुषंगाने मागील 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या 123 नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले.
बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 नैमित्तिक कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कामगारांच्या वारसांना विद्युत विभागात अनुकंपा तत्वावर सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याऐवजी, या कर्मचाऱ्यांना नैमित्तिक कामगार म्हणून रोजंदारीवर घेण्यात आले होते. यामुळे कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी 16 वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता. अखेर या संघर्षाला यश मिळाले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर🕓 3.50pm | 30-11-2023 📍 Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.५० वा. | ३०-११-२०२३ 📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2023
🔸बेस्टमधील 123 नैमित्तिक कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम@PrasadLadInd @GopichandP_MLC @myBESTBus#Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/hZoDPrelMu
ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल (e-Shram portal) सुरू केले आहे. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या ई-श्रम नोंदणी कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!
ई-श्रम पोर्टल (E-labor portal) यात नोंदीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेचे महामंडळ तयार केले आहे. ज्याच्या माध्यमातून जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना 14 प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात आरोग्य कवच, अकाली मृत्यू झाल्यानंतरची मदत, मुलांचे शिक्षण, पेन्शन, निवृत्तीनंतर जगण्याची साधने इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
$ads={2}
आनंदाची बातमी! करार तत्वावरील कर्मचारी शासन सेवेत नियमित