Cleaner Worker News : राज्यातील सफाई कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

Cleaner Worker News : राज्यातील सफाई कामगारांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांकडून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातील मागण्यानुसार सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

$ads={1}

राज्यातील सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू

Cleaner Worker News

दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सफाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या लाड पागे समिती शिफारशींबाबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये मंत्री श्री देसाई म्हणाले की, सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय (GR) रद्द करून एकत्रित नवीन सुधारित शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छ संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशीबाबत मा. न्यायालयाच्या स्थगितीबाबत सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करून शासनाची बाजू मांडावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत. समन्वय समितीने आंदोलन करू नये, असे आवाहन यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी केले.

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित,नियुक्ती पत्रांचे वाटप

या बैठकीस समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव र.शि.गोरवे, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

$ads={2}

सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी गुड न्यूज!
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा