Contract Employees Regularization : आरोग्य सेवेत कायम सामावून घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. यामध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर आणि परिचारिकांसह कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहे. आरोग्य विभागातील रिक्त जागेवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सरसकट समायोजन करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
$ads={1}
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- आरोग्य विभागातील रिक्त जागेवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सरसकट समायोजन करावे
- समान काम समान वेतन लागू करणे
- विमा सुरक्षा धोरण लागू करणे व इतर मागण्या
सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम होणार
त्यानुसार आरोग्य विभागात दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांवर सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी सरळसेवेने 70 टक्के व उर्वरीत 30 टक्के पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा 10 वर्षा पेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या कंत्राटी (तांत्रिक/अतांत्रिक) कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकरीता वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय! अखेर नवीन शासन निर्णय जारी
हे ही वाचा : महागाई भत्ता GR - कंत्राटी कर्मचारी - नोकरीच्या संधी - परीक्षांचे निकाल
प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश
तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरीतांचे सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल व दुरुस्ती करुन मान्यता प्राप्त करुन घेण्याचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेळी देण्यात आले आहे. अधिक वाचा..
मात्र जोवर आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागेवर सामावेजनाचा निर्णय प्रत्यक्षात घेतला जात नाही, तोवर हे कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मिडियाच्या माध्यामतून कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.