महत्वाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय! अखेर नवीन शासन निर्णय जारी

Contract Employees Salary Increase : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person- CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांच्या मासिक मानधनात केलेली वाढ व स्वयंसहाय्यता गटांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा वाढीव फिरता निधी अर्थसंकल्पीत करण्यासाठी नवीन शासन निर्णय दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय! अखेर नवीन शासन निर्णय जारी

Contract Employees Salary Increase

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल ६००० रुपये दरमहा मानधन अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!

तसेच उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्य:स्थितीत अ,ब आणि "क" वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम १५,००० रुपये फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन 'अ' वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना ३०,००० रुपये व वर्गवारी ब आणि क मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत छ संभाजीनगर येथील दिनांक १६.०९.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. सदर निधी हा राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्याने नवीन लेखाशीर्ष उघडण्यासाठी दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्ण्यान्वये शासनाने मान्यता दिली आहे.

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित,नियुक्ती पत्रांचे वाटप
सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी गुड न्यूज!

Previous Post Next Post