Dearness Allowance Hike News : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक (Pensioners) कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या (Family Pensioners) महागाई भत्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी वित्त विभागाने घेतला असून, महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू असणार असून, नोव्हेंबर च्या पगारासोबत रोखीने अदा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
अखेर! राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ!
राज्य शासकीय (7th Pay Commission) नुसार वेतनश्रेणी लागू असणाऱ्या निवृत्तिवेतनधारक (Pensioners) कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना (Family Pensioners) त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर महागाई वाढीचा दर ४२% वरुन ४६% सुधारीत करण्यात आला आहे.
राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक अद्यापही असुधारित 6 व्या वेतनश्रेणीनुसार (6th Pay Commission) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेत आहेत, त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन रकमेवर महागाई वाढीचा दर २२१% वरुन २३०% करण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन होणार?तसेच राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक अद्यापही असुधारित 5 व्या वेतनश्रेणीनुसार (5th Pay Commission) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेत आहेत, त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन रकमेवर महागाई वाढीचा दर ४१२% वरुन ४२७% करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता सुधारित दर शासन निर्णय
1 जुलै 2023 पासून थकबाकीसह मिळणार महागाई भत्ता वाढ!
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर २०२३ च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
सदर महागाई वाढ दिनांक १ जुलै, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर २०२३ च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
मोठी अपडेट! आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पहा
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती
ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक तसेच जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना हा निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू असणार आहे.
शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तिवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश, योग्य त्या फेरफारांसह, आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील. असे महागाई भत्ता वाढ शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाची अपडेट! जिल्हा परिषद भरती नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर
तलाठी भरती महत्वाचे नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर