Talathi Bharti 2023 : मोठी अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

Talathi Bharti 2023 : तलाठी सरळसेवा भरती 2023 भरतीची जाहिरात 26 जून 2023 रोजी प्रसिद्ध करणेत आलेली होती. त्यानुसार पात्र उमेदवारांची सदर तलाठी पदभरती परीक्षा दिनांक 27 जुलै ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 57 सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे. आता या सरळसेवा तलाठी पदभरतीच्या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे, भरावयाच्या एकूण पदांची संख्या आता 4 हजार 993 इतकी झाली आहे, त्यास शासनाने मान्यता दिली असून, याबाबतचे अत्यंत महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हानिहाय सुधारित जागांचा तपशील पाहण्यासाठी या लेखामध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे.

$ads={1}

मोठी अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

Talathi Bharti Update 2023


महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट- क) संवर्गाचे Talathi Bharti 2023 सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दिनांक 26 जून 2023 रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर जाहिरातीतील मुद्दा क्र.4.1 व 4.3 नुसार पदभरतीचे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल (कमी वाढ) होण्याची शक्यता असले बाबत नमूद करणेत आलेले आहे. तसेच जाहिरातीमधील परिशिष्ट 1 मध्ये तलाठी पदभरती करिता जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करणेत आलेला आहे. 

तसेच कार्यालयाकडील 24 जुलै 2023 अन्वये गडचिरोली व पालघर जिल्हयाचे सुधारित मागणीपत्रक प्रसिध्द करणेत आलेले आहे. तथापि, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील 28 जून 2023 अन्वये अनुकंपाची पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने तसेच अतिरिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून अनुकंपाची पदे भरणेत आल्याने बिंदुनामावली प्रमाणे फेर आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रक सादर करणेच्या सूचना देणेत आलेल्या होत्या.

ठाणे महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती

याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रके प्राप्त झालेली असून, राज्यभरात भरावयांच्या पदांमध्ये एकुण 149 ने वाढ होत आहे. सुधारित मागणीपत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्तपदे भरण्यास शासनकडून मान्यता देणेत आलेली आहे.

जाहिरातीनुसार प्रसिध्द परिशिष्ट 1 मध्ये बदल होऊन भरावयाच्या एकूण पदांची संख्या आता 4 हजार 993 इतकी झाली आहे. त्यानुसार सुधारित परिशिष्ट प्रसिद्ध करणेत आले आहे.

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

Talathi Bharti Update 2023

$ads={2}

तलाठी भरती 2023 -  जिल्हानिहाय सुधारित जागांचा तपशील पहा

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पद भरतीबाबत मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल रिट याचिका आदेशास अधिन राहून तसेच इतर न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या निर्णयास अधिन राहून सदरचे मागणीपत्रक प्रसिद्ध करणेत आले आहे. असे महाभूमी अभिलेख (Mahabhumi Abhilekh) महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाने काढलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा