7th Pay Commission Pay Scale : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातवा वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने श्री. के. पी. बक्षी, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती, सदर समितीच्या शिफारशी 7th Pay Commission Pay Scale मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेतनस्तर पाहूया..
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री. के. पी. बक्षी, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 मध्ये स्थापना करण्यात आली होती.
राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून, राज्य शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाही आणि लागू करावयाचे असल्यास ग्राम विकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येते.
त्यामुळे आता सुधारित वेतनस्तर राज्यातील जिल्हा परिषदमधील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), विस्तार अधिकारी या संवर्गांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम; शासन आदेश जारी..
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू
राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य केल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील ज्या संवर्गांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात आले आहेत अशा संवर्गांची माहिती दर्शविणारे विवरणपत्र पुढीलप्रमाणे
- लघुलेखक (उच्चश्रेणी) पूर्वीची वेतनश्रेणी : S-15:41800-132300
- लघुलेखक (उच्चश्रेणी) सुधारित वेतनश्रेणी : S -16: 44900 - 142400
- लघुलेखक (निम्नश्रेणी) पूर्वीची वेतनश्रेणी : S-14: 38600-122800
- लघुलेखक (निम्नश्रेणी) सुधारित वेतनश्रेणी : S-15 : 41800 - 132300
- विस्तार अधिकारी पूर्वीची वेतनश्रेणी : S-13 : 35400 - 112400
- विस्तार अधिकारी सुधारित वेतनश्रेणी : S-14 : 38600 - 122800
या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनस्तर लागू करण्याबाबत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता निधी मंजूर; शासन आदेश जारी..
कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम; शासन आदेश जारी..
$ads={2}
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी