Diwali Holidays 2023 : या महिन्यात तब्बल 24 दिवसांची दिवाळी सुट्टी! यादी पहा

Diwali Holidays 2023 : यंदा वर्षभरात तब्बल 128 सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या असून, आता नोव्हेंबर महिन्यात सार्वजनिक तसेच शाळांना असणाऱ्या सुट्या अशा तब्बल 21 ते 24 दिवस सुट्ट्या मिळणार आहे, नुकतीच राज्य सरकारने अजून एक सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची अधिसूचना काढली आहे, त्यामुळे अजून एका सुट्टीची भर पडली असून, या लेखामध्ये नोव्हेंबर 2023 या महिन्यातील सुट्ट्या तसेच शाळा आणि बँकेला असणाऱ्या सुट्ट्या किती मिळणार आहे? सविस्तर वाचा..

$ads={1}

या महिन्यात तब्बल 24 दिवसांची दिवाळी सुट्टी! यादी पहा

Diwali Holidays 2023

सन 2023 या वर्षातील अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने बाकी आहे, तुम्ही जर Holidays Plan करत असाल तर नक्कीच सार्वजनिक सुट्ट्या कधी? व किती? मिळणार आहे, यानुसार तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता, इथे तुम्हाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी दिलेली आहे. 

दिवाळी हा सण वर्षभरातील सर्वात मोठा सण साजरा केला जातो. उन्हाळी सुट्टीनंतर सर्वात जास्त दिवस सुट्टी ही दिवाळी निमित्त विद्यार्थी तसेच नोकर वर्गाना मिळत असते.

राज्य शासनाने आता नोव्हेंबर महिन्यात अजून एक अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टी अधिसूचनेनुसार नोव्हेंबर 2023 या महिन्यात दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन), 12 नोव्हेंबर 2023, दिवाळी (बलिप्रतिपदा), 14 नोव्हेंबर 2023, 15 नोव्हेंबर 2023 (भाऊबीज), गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर 2023 या सुट्या जाहीर केलेल्या आहेत, तसेच या महिन्यात 4 रविवार आणि 4 शनिवार (पाच दिवसाचा आठवडा) अशा एकूण 11 सार्वजनिक सुट्ट्या आणि दीपावली सणाच्या अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! पुढील वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

राज्यातील शाळांना 21 ते 24 दिवसांची दिवाळी सुट्टी!

राज्यामध्ये विविध विभागानुसार दिवाळी सणाच्या सुट्ट्या कमी जास्त मिळतात, कारण कोकणात गणपती उत्सव, तसेच विदर्भातील शाळा जून मध्ये उन्हाच्या तीव्रतेने उशिरा सुरु होतात, तसेच मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमानुसार शाळांच्या सुट्ट्या 1 ते 2 दिवस मागे पुढे असतात मात्र यंदा जिल्हा परिषदेने शाळांना जाहीर केलेल्या सुट्यानुसार  बीड , परभणी, हिंगोली जिल्ह्यात 6 नोव्हेंबर पासून तर  जालना 9 नोव्हेंबर पासून दीपावलीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यातील संबंधित जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या सुट्ट्या ह्या 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे.

$ads={2}

इंडिया पोस्ट विभागामध्ये विविध पदांच्या 1800+ रिक्त जागांसाठी जाहिरात
मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

दिवाळी सणानंतर पुन्हा दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार व दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुनानक जयंती असल्याने, दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पासुन नियमित शाळा सुरू होणार आहेत. अशा एकूण जवळपास 21 ते 24 दिवसाची दीर्घ सुट्टी शाळांना मिळणार आहे. 

या महिन्यात राज्यात बँकांना 10 दिवस सुट्ट्या -  Bank Holidays 2023

महाराष्ट्रातील बँका नोव्हेंबर 2023 मध्ये 10 दिवस बंद असणार आहे, त्यामध्ये 4 रविवार आणि 4 शनिवार, सोबतच दिनांक 14 नोव्हेंबर 2023 दिवाळी (बली प्रतिपदा) आणि दिनांक 27 नोव्हेंबर 2023- गुरु नानक जयंती निमित्त बँकांना सुट्ट्या असणार आहे.

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी सरकारी कर्मचारी

Previous Post Next Post