सन २००५ पुर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेत कार्यरत असलेल्या व दि. २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेनुसार आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समावेशन करण्यात आले आहे, आता पूर्वीच्या अस्थायी पदावर कार्यरत असलेल्या कालावधीतील लाभाबाबत नुकताच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मा. मॅट मुंबई) यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे, त्या आदेशानुसार शासनाने या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
$ads={1}
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत सामावेशन, अस्थायी सेवेच्या कालावधीबाबत मा.मॅटचा दिलासादायक निर्णय!
दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार याचिकेतील सन २००५ पुर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेत कार्यरत असलेल्या व दि २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचन्वये (सन २००९ व सन २०१० अशा दोन टप्यात) नियमित सेवेत समावेशन झाले आहे.
या सर्व वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मा. मॅट, मुंबई) यांच्या आदेशानुसार नियमित पदावर केलेल्या अस्थायी सेवेच्या कालावधीतील तांत्रिक खंड अर्जित रजेमध्ये रुपांतरीत करुन, सदर सेवा कालावधीतील अर्जित रजा व वार्षिक वेतनवाढी मंजूर करुन सदरचे वैद्यकीय अधिकारी समावेशनापूर्वी नियमित पदावर ज्या तारखेला अस्थायी स्वरुपात सेवेमध्ये प्रथमतः हजर झाले त्या तारखेपासून आजपावेतोची वेतननिश्चिती करण्यास शासनाने दिनांक ८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. (शासन निर्णय)
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज
जिल्हा परिषद भरती पुढील परीक्षेचे वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा
मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, येथे पहा
$ads={2}