MPSC Timetable 2024 : मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC Timetable 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. वेळापत्रकानुसार MPSC संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये येणार असून, सदरची परीक्षा जून मध्ये होणार आहे, जाहिरात, परीक्षेचे वेळापत्रक सविस्तर पाहूया, तसेच Mpsc Time Table 2024-25 Pdf Download करण्यासाठी डायरेक्ट लिंक या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे.

मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

mpsc timetable 2024

महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक, विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांसाठी संयुक्त परीक्षा जाहीर फेब्रीवारी २०२४ मध्ये येणार असून, जून मध्ये परीक्षेचे नियोजन आहे, तर ऑगस्ट मध्ये निकाल लागण्याचे नियोजन आहे. तसेच विविध संवर्गातील पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक Mpsc Time Table 2024-25 Pdf Download खालील लिंक वर तुम्ही डाउनलोड करू शकता.

ठाणे महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती - मोठी अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर केलेले सदरचे वेळापत्रक संभाव्य असून, जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - जिल्हा परिषद परीक्षा नवीन वेळापत्रक पहा - शिक्षक भरती मोठी अपडेट!

अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात, अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

$ads={2}

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक येथे डाउनलोड करा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू..
अस्थायी सेवेच्या कालावधीबाबत मा.मॅटचा दिलासादायक निर्णय!

Previous Post Next Post