Thane Municipal Corporation Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील परिचारीका (Nurse) संवर्गातील एकूण 100 रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (१७९ दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी (WALK IN INTERVIEW) उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या
पदांचा तपशील
- पदाचे नाव : परिचारीका (Nurse)
- एकूण जागा : 100
- दरमहा मानधन : 30,000
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C)
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.)
- बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ/ परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.
- ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी. एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ - कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. २२/११/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
$ads={2}