मोठा निर्णय! बीएस्सी व पीबीबीएस्सी (नर्सिंग) ही समकक्ष शैक्षणिक अर्हता जाहीर

Nursing Course Equivalent : भारतीय परिचर्या परिषद यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बीएस्सी (नर्सिंग) व पीबी बीएस्सी (नर्सिंग) ही समकक्ष शैक्षणिक अर्हता (Equivalent) म्हणून नमूद आहे. त्यानुसार आता ज्या ठिकाणी बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) पदवी नमूद आहे त्या सर्व ठिकाणी पीबीबीएससी (नर्सिंग) पदवी ही समकक्ष पदवी समकक्ष शैक्षणिक अर्हता जाहीर करण्यात आली आहे.

मोठा निर्णय! बीएस्सी व पीबीबीएस्सी (नर्सिंग) ही समकक्ष शैक्षणिक अर्हता जाहीर

Nursing Course Equivalent

शुश्रूषा संवर्गातील अधिपरिचारीका संवर्गातील अधिपरिचारीका ते सहाय्यक अधिसेविका या पदांचे सेवाप्रवेश नियम दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अधिसूचित करण्यात आलेले आहेत, या सेवा प्रवेश नियमात बेसिक बीएसस्सी ही शैक्षणिक अर्हता नमूद आहे. परंतु, पोस्ट बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) या पदवी अभ्यासक्रमांसाठी समकक्ष शैक्षणिक अर्हता असल्याने समकक्ष पदवी म्हणून पोस्ट बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) या पदवीचा समावेश सेवाप्रवेश नियमामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी महत्त्वाचे अपडेट - सरकारी कर्मचारी बातम्या - सरकारी नोकरीच्या संधी

आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अंतर्गत कार्यरत GNM अधिपरिचारीका यांचे व्यवसाय कौशल्य व ज्ञान कृदीकरीता सेवांतर्गत पोस्ट बेसिक बीएस्सी नर्सिंग (PB B.Sc. Nursing) हा पदवीचे २ वर्ष अतिरीक्त शिक्षण (Additional Qualification) देण्यात येते. भारतीय परिचर्या परिषद Indian Nursing Council च्या मार्गदर्शक सुचनांनुसार अनुक्रमे एएनएम जीएनएम व बीएस्सी नर्सिंग कोर्स अध्यापनासाठी पाठनिर्देशिकासाठी खालीलप्रमाणे अर्हता निश्चित केल्या आहे.

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती

कोर्सचे नाव - भारतीय परिचर्या परिषदेनुसार अर्हता

  1. एएनएम - B.Sc. Nursing/Diploma in Nursing Education and Administration/Diploma in Public Health Nursing with 2 years of clinical experience
  2. जीएनएम (GNM) - M.Sc. Nursing or B.Sc. Nursing (Basic/ Post Basic) or Diploma in Nursing Education and Administration with 2 years of professional experience
  3. बीएस्सी नर्सिंग (B.Sc Nursing) - M.Sc. (Nursing) preferable Experience; B.Sc. (Nursing) (P.B.B.Sc. (Nursing) with 9 year experience 

शुश्रूषा संवर्गातील विविध पदांच्या अधिसूचित सेवाप्रवेश नियमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) पदवी नमूद आहे त्या सर्व ठिकाणी पीबीबीएससी (नर्सिंग) पदवी ही समकक्ष पदवी असल्याचे समजण्यात येईल. तथापि, सेवाप्रवेश नियमात नमूद केल्यानुसार पीबीबीएस्सी (नर्सिंग) हा अभ्यासक्रम दूरस्थ (Distance learning) माध्यमातून शिक्षण घेतले असल्यास ते ग्राहा घरण्यात येणार नाही. (शासन निर्णय)

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा