राज्यातील सरकारी तसेच कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, कामगारांना रु 50 लाखाचे विमा कवच देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागाने काढले आहे.
$ads={1}
राज्यातील सरकारी तसेच कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच! महत्वाचे परिपत्रक
सन 2020 21 मध्ये कोरोना विषाणूचा संपूर्ण देशात मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होता. राज्यात या विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना सुरू होत्या.
ग्रामीण पातळीवर देखील सदर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने विभागाने ग्रामपंचायत स्तरावरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, सी.एस.सी. कंपनीचे केंद्र चालक, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पध्दतीवरील कर्मचारी, कामगार यांना कोवीड विषयक कर्तव्य बजावताना दिनांक 14 मे 2021 च्या शासन निर्णयान्वये कोविड - 19 संसर्ग आजारामुळे दि. 30 जून, 2021 पर्यंत मृत्यु झाल्यास मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना रु. 50 लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे.
मोठी बातमी! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ!
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सामावेजन शासन निर्णय
जिल्हा परिषदांकडून ग्रामविकास विभागाकडे कोवीड-१९ सानुग्रह अनुदान अदा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी परिपूर्ण (त्रुटीविना) असलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करुन मयत कर्मचाऱ्यांचा वारसांना रु. 50 लाखाचे सानुग्रह अनुदान अदा करण्यात आले आहे.
जिल्हा परिदांकडून प्राप्त झालेल्या काही कोवीड प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानुषंगाने माहे फेब्रुवारी 2023 मध्ये सदर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आलेले आहे. काही जिल्हा परिषदांकडून त्रुटींची पुर्तता करण्यात आली. परंतु काही जिल्हा परिषदांनी अद्यापपर्यंत सदर त्रुटींची पुर्तता केलेली नाही.
$ads={2}
तरी आता याबाबत कोवीड-१९ सानुग्रह प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता तात्काळ करण्याबाबत ग्रामविकास विभागाने सर्व संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे. (परिपत्रक)