मोठा निर्णय! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत केले नियमित, 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू

Contractual Employees Regularisation News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील समुह संघटक पदावर कार्यरत ठोक मानधनावरील (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना समुह संघटकांच्या नेमणूका विहीत मार्गाचा अवलंब करून झाल्याने, सदर समुह संघटकांना आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर कायम करण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, तसा शासन आदेश दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत केले नियमित

Contractual Employees Regularisation News

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत 'समुह संघटक' पदावर करार पध्दतीने (कंत्राटी) तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कार्यरत समूह संघटकांना, इतर महानगरपालिकांमध्ये ज्याप्रमाणे ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे. 

त्याच धर्तीवर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील करार पध्दतीवरील (कंत्राटी) तात्पुरत्या स्वरूपातील कार्यरत असलेले समुह संघटकांना, कल्याण-डोंचिवली महानगरपालिका आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदावर नियमित समावेशन करणेबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्याची आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी विनंती केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन होणार?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा आकृतीबंध दि.०१.०६.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला आहे. सदर आकृतीबंधात समुह संघटकांची ०३ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. 

आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचे प्रस्तावाचे अवलोकन केले असता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर करार पध्दतीने (कंत्राटी) तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कार्यरत ३ ही समुह संघटकांच्या नियुक्त्या ह्या विहीत प्रक्रियेने (जाहिरात/लेखी परिक्षा/ मुलाखत) झालेल्या आहेत, त्यामुळे सेवाप्रवेश नियमातील शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असल्याने, समुह संघटक पदासाठी पात्र ठरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महत्वाची बैठक संपन्न

7 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू

या कर्मचाऱ्यांना आता ७ व्या वेतन आयोगानुसार एस-८ २५५००-८११०० ही वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तसेच पदस्थापनेच्या दिनांकापासून कायम सेवेचे तद्‌नुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन इत्यादी) लाभ लागू असणार आहे. (शासन निर्णय)

$ads={2}

Previous Post Next Post