मोठी बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय पहा

Pik Vima Advance

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप (Pik Vima Advance) वेगाने सुरु असून, आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत.  यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली.

$ads={1}

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती.  आता 12 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.  राज्य स्तरावर सध्या बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे.  यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय

संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे

  1. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार 
  2. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला 
  3. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ 
  4. आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
  5. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी
$ads={2}

इंडिया पोस्ट विभागामध्ये विविध पदांच्या 1800+ जागा

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक
सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी सरकारी कर्मचारी

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा