Talathi Bharti 2023 : तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

Talathi Bharti 2023 : तलाठी सरळसेवा भरती 2023 भरतीची जाहिरात 26 जून रोजी प्रसिद्ध करणेत आलेली होती. त्यानुसार पात्र उमेदवारांची सदर तलाठी पदभरती परीक्षा दिनांक 27 जुलै ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 57 सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे. 

त्यानंतर तलाठी भरती परीक्षा Answer Key उमेदवारांना 28 सप्टेंबर 2023 पासून त्यांचे लॉगइन आयडी वर परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, व त्यावर प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे इ. बाबत आक्षेप, हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि. 28 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात आली होती. 

आता याबबतचे महत्वाचे तलाठी सरळसेवा भरती 2023 प्रसिद्धी पत्रक 18 ऑक्टोबर रोजी महाभूमीकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ किती? आणि जिल्हानिहाय निकाल लिंक खाली दिलेली आहे.

$ads={1}

तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

talathi-bharti-2023-update

तलाठी भरती परीक्षा Answer Key च्या अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे इ. बाबत आक्षेप, हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात आली होती. त्याबाबत TCS कंपनीकडून प्राप्त आक्षेप, हरकतीची आकडेवारी आता उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.

सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीचे समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करून देणेत येणार आहे. ज्या सत्राच्या परिक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप, हरकत समितीमार्फत स्विकृत झालेस त्या सत्राची सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तद्नंतर कोणतही आक्षेप, हरकत विचारात घेण्यात येणार नाहीत.

हे ही वाचा - जिल्हा परिषद भरती परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर!

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय! महत्वाचे परिपत्रक

तलाठी परिक्षेबाबत प्राप्त आक्षेप, हरकती एकूण आकडेवारी

  1. Shift 1 - 6162
  2. Shift 2 - 5331
  3. Shift 3 - 4710
  4. Total - 16203
Talathi Bharti 2023 Update
Talathi Bharti 2023

$ads={2}

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज

बार्टी कडून मोफत प्रशिक्षणासह नोकरीची हमी!
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा