7th Central Pay Commission : दसरा-दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गिफ्ट! महागाई भत्त्यात 'इतकी' वाढ

7th Central Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अखेर सरकारने दसरा-दिवाळीपूर्वीच मोठे गिफ्ट दिले आहे, याचा लाभ देशभरातील  48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतनधारकांना झाला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारात आता सातव्या वेतन आयोगानुसार DA वाढ करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला असून, हा लाभ 1 जुलै 2023 पासून लागू असणार आहे. कितीने महागाई भत्यात झाली वाढ? आणि पगारात किती होईल वाढ? सविस्तर वाचा..

$ads={1}

दसरा-दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गिफ्ट! महागाई भत्त्यात 'इतकी' वाढ

7th Central Pay Commission

कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा वाढ करते. या वर्षातील पहिली वाढ म्हणजेच DA वाढ ही 24 मार्च 2023 रोजी करण्यात आली आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा  हप्ता (DR) वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. महागाई भत्याची वाढ ही 1 जुलै 2023 पासून लागू असणार आहे, सध्या कर्मचाऱ्यांना  42 टक्के प्रमाणे DA मिळत आहे, यामध्ये आणखी 4% वाढ झाली आहे. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन (7th Pay Commission) नुसार मिळणार आहे.

महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर एकत्रित 12,857 कोटी रुपये प्रतिवर्ष इतका भार वाढेल.याचा लाभ सुमारे 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज

पगारात कितीने होणार वाढ?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्यांचे मूळ वेतन 18000 आहे, त्यांना महागाई भत्ता 42 टक्के प्रमाणे 7 हजार 560 रुपये मिळतात. आता कर्मचाऱ्यांच्या  DA मध्ये 4 टक्के वाढ म्हणजे महागाई भत्ता 46% झाला आहे. त्यानुसार महागाई भत्ता वार्षिक 8 हजार 640 रुपये होईल, तर दरमहा वेतनात 720 रुपयांची वाढ होऊ होईल. हे आकडे मूळ वेतन आणि निवृत्तीवेतनानुसार यामध्ये बदल असणार आहे.

$ads={2}

मोठी अपडेट! शिक्षक भरतीच्या TET परीक्षेबाबत महत्वाची बैठक संपन्न
जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट!

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ
महिला व मुलींसाठी जबरदस्त योजना पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा