Railway Bonus: सणासुदीत केंद्र सरकारकडून मोठी भेट, DA नंतर आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर..

Central Government Railway Employees Bonus

Central Government Railway Employees Bonus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022 23 साठी सर्व पात्र अराजपत्रित (Railway Employees) रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत Bonus देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयातील कर्मचारी वर्ग आणि इतर गट 'क' कर्मचारी  (आर पी एफ /आर पी एस एफ कर्मचारी वगळून) यांचा समावेश आहे.

$ads={1}

दसरा-दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना गिफ्ट!

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 11,07,346 रेल्वे कर्मचाऱ्यांना 1968.87 कोटी रुपयांचा उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये रेल्वेची कामगिरी अत्यंत उत्तम राहिली. रेल्वेने 1509 दशलक्ष टन इतकी  विक्रमी मालवाहतूक आणि जवळपास 6.5 अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

या विक्रमी कामगिरीसाठी अनेक घटकांचे योगदान लाभले आहे. यामध्ये केंद्र सरकारने रेल्वेतील पायाभूत सेवांमध्ये भांडवली खर्चासाठी केलेली विक्रमी गुंतवणूक, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. 

उत्पादनाशी निगडीत बोनसमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

$ads={2}

मोठी अपडेट! शिक्षक भरतीच्या TET परीक्षेबाबत महत्वाची बैठक संपन्न

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज
तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ
महिला व मुलींसाठी जबरदस्त योजना पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा