गुड न्यूज! अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना भाऊबीज भेट मिळणार

Anganwadi Workers Bhaubij Gift: राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता मंजुरी मिळाली आहे. बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

$ads={1}

गुड न्यूज! अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना भाऊबीज भेट मिळणार

Anganwadi Workers Bhaubij Gift

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हेच लक्षात शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहेत. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत  सन २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना "भाऊबीज भेट" वितरित करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे अदा करण्याकरिता मंजुरी दिली आहे.

जिल्हा परिषद भरती पुढील परीक्षेचे वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा
मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, येथे पहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन जाहिरात; या तारखेपर्यंत करा अर्ज..

$ads={2}

भाऊबीज भेट साठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊबीज भेट बाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोठी अपडेट! शिक्षक भरतीच्या TET परीक्षेबाबत महत्वाची बैठक संपन्न

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज
केंद्राकडून मिळणार 9 हजार ते 14600 रुपयांची शिष्यवृत्ती
प्रधानमंत्री मातृवंदना सुधारित योजना

महिला व मुलींसाठी जबरदस्त योजना पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post