Pre Matric Scholarship: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल द्वारे केंद्र सरकार मार्फत राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली असून, पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 9000 ते 14 हजार 600 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
केंद्राकडून मिळणार 9 हजार ते 14600 रुपयांची शिष्यवृत्ती
प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीमध्ये https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण संचालक यांनी केले असून, राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वरील सर्व योजनांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. राज्यातील अनुदानित शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली असून, विद्यार्थी स्वतंत्रपणे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023
- शाळा स्तरावर अर्जाची पडताळणी - 15 नोव्हेंबर 2023
- जिल्हास्तरावर अर्जाची पडताळणी - 30 डिसेंबर 2023
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता निकष
- अनुदानित शाळेतील इयत्ता नववी व दहावी चे विद्यार्थी
- दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% किंवा त्याहून जास्त असणे आवश्यक आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा अधिक नसावे
- पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 9000 ते 14 हजार 600 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
- सदर शिष्यवृत्ती ही एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता पहा
$ads={2}