मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर - ZP Exam New Time Table 2023

ZP Exam New Time Table 2023 : जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील महाभरती परीक्षा जाहीर झाली असून, सदर परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 1 ते 3 सत्रांत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर पाहूया, तसेच जिल्हानिहाय महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

zp exam new time table 2023

जिल्हा परिषद धुळे जिल्ह्यातील भरतीच्या जाहिरात अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी 1 ते 3 सत्रांत आयोजित करण्यात आली आहे.

तसेच दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी 1 व 2 या सत्रांत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य्) (बांधकाम/ग्रामिण पाणी पुरवठा) या पदासाठी परीक्षा होणार आहे.

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

तर दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी वरिष्ठ सहाय्यक या पदाची ऑनलाईन परिक्षा धुळे शहरातील 3 संगणकीय परिक्षा केंद्रावर होणार आहे, असे मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर व धुळे जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे याबाबत सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)

हे ही वाचा - मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक  - जिल्हा परिषद परीक्षा नवीन वेळापत्रक पहा - मोठी अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

तसेच जिल्हा परिषद अहमदनगर पदभरती सन नोव्हेंबर 2023 ऑनलाईन परिक्षा वेळापत्रक दिनांक 17/11/2023 ते 20/11/2023 या कालावधीत JUNIOR ENGINEER (CIVIL) (WORKS/ RURAL WATER SUPPLY) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / ग्रामीण पाणी पुरवठा या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.

zp exam new time table 2023

राज्यातील सर्वच जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक आता जाहीर होत असून, तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट जिल्ह्याच्या खालील अधिकृत लिंकवर पाहू शकता.

जिल्हानिहाय वेळापत्रक येथे पहा

$ads={2}
Previous Post Next Post