Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन जाहिरात; या तारखेपर्यंत करा अर्ज..

Anganwadi Bharti 2023:  महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरती 2023 अंतर्गत, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांच्या राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे भरण्यात येत आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत नवीन जाहिरात देण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 19 ऑक्टोबर ते  2 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, सविस्तर तपशील पाहूया..

$ads={1}

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन जाहिरात

Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी भरती आवश्यक पात्रता

 1. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 2. स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 3. अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)
 4. लहान कुटुंब पात्रता आवश्यक (उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत)
 5. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 6. याव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद इतर पात्रता असणे आवश्यक राहील.

अंगणवाडी सेविका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 

 • शैक्षणिक पात्रता संबंधित (सर्व कागदपत्रे)
 • जन्म दाखला
 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
 • रहिवासी दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
 • स्थानिक रहिवासी असलेल्या बाबतचा दाखला
 • जाहिरातीमध्ये नमूद संबंधित कागदपत्रे

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे सुधारित पगार पुढीलप्रमाणे 

 • अंगणवाडी सेविका -  10 हजार रुपये 
 • मिनी अंगणवाडी सेविका - 7200 रुपये 
 • अंगणवाडी मदतनिस - 5525 रुपये

महिला व बाल विकास विभागाचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी व नागरी जिल्हा लातूर कार्यालयाच्या अधिनस्त अंगणवाडी मदतनीसांचे व मिनी अंगणवाडी सेविका यांचे रिक्त पदे भरणे बाबत जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिलेल्या पत्यावर दिनांक 19 ऑक्टोबर ते  2 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी!
मनरेगा अंतर्गत 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे निवड!
बार्टी कडून मोफत प्रशिक्षणासह नोकरीची हमी!

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा लातूर या प्रकल्प कार्यक्षेत्रांतर्गत 23 मदतनीस व 1 मिनी अंगणवाडी सेविका यांचे रिक्त पदांची भरती प्रक्रिया सन 2023 साठी (लातूर शहर वगळून) लातूर जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायत शहरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवादका या रिक्त पदांसाठी एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination) अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

$ads={2}

Previous Post Next Post