GDS Result 2023 : मोठी अपडेट! ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; दहावीच्या गुणांवर 5528 उमेदवारांची निवड

GDS Result 2023 : इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक मध्ये शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी जाहिरात निघाली होती, त्यामध्ये इयत्ता 10 वी पास उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास आवाहन करण्यात आले होते, या भरतीचा तिसरी यादी 20 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे, या लेखाच्या शेवटी GDS 3rd Merit List 2023 Pdf Download डायरेक्ट लिंक दिलेली आहे, येथून तुम्ही यादीत नाव चेक करू शकता.

मोठी अपडेट! ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर

GDS Result 2023

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल पहिली यादी (GDS Result) दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली असून, दुसरी यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे, आता तिसरी मेरीट लिस्ट 20 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल व एसएमएस पाठवण्यात आले आहेत.

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती मध्ये इयत्ता 10 वी च्या गुणांवर थेट निवड केली जाते. जून-जुलै 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक ,  इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

दहावीच्या गुणांवर 5528 उमेदवारांची थेट निवड

याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले होते. त्यानुसार आता या भरतीचा निकाल https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर  जाहीर झाला आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 9 ऑक्टोबर 2023 पूर्वी कागदपत्रे पडाळणीसाठी उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या यादीनुसार 3152 उमेदवारांची निवड झाली आहे. तर दूसऱ्या यादीत 1538 आणि तिसऱ्या यादीत 838 असे एकूण 5528 उमेदवारांची थेट दहावीच्या गुणांवर निवड झाली आहे.

ग्रामीण डाक सेवक तिसरी यादी - येथे पहा
ग्रामीण डाक सेवक दुसरी यादी - येथे पहा
ग्रामीण डाक सेवक पहिली यादी - येथे पहा
Previous Post Next Post