Maha Pwd Recruitment 2023 : सुवर्णसंधी! सार्वजनिक बांधकाम विभागात 2 हजारांहून अधिक पदांची महाभरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तब्बल 14 संवर्गातील एकूण 2 हजार 109 जागांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 6 नोव्हेंबर 2023 या पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, तेव्हा या मोठ्या भरतीची सुवर्णसंधी मिळाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात 2 हजारांहून अधिक पदांची महाभरती

Maha Pwd Recruitment 2023

पदांचा तपशील व रिक्त जागा खालीलप्रमाणे

 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 532 
 2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 55 
 3. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 5  
 4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -1378 
 5. लघुलेखक (उच्च श्रेणी) - 8 
 6. लघुलेखक (निम्न श्रेणी) - 2 
 7. उद्यान पर्यवेक्षक - 12 
 8. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 9
 9. स्वच्छता निरीक्षक - 1 
 10. वरिष्ठ लिपिक - 27 
 11. प्रयोगशाळा सहाय्यक - 5 
 12. वाहन चालक (Driver) - 2 
 13. स्वच्छक (Clener) - 32 
 14. शिपाई -  41 

अशा एकुण 2 हजार 109 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

आवश्यक शैक्षणिक पात्रता

विविध 14 संवर्गातील पदनिहाय पात्रता सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, करिता अभियांत्रिकी पदवी / 10 वी / 12 वी / मराठी 30 श.प्र.मि टायपिंग, 40 श.प्र.मि इंग्रजी विषयातील टायपिंग / लघुलेख 120 श.प्र.मि , लघुलेखन 100 श.प्र. मि / वास्तुशास्त्र पदवी / स्वच्दता निरीक्षक प्रमाणपत्र / वाहन चालविण्याचा परवाना / कोणतीही पदवी / 7 वी उत्तीर्ण उमेदवार सदर भरती साठी अर्ज करू शकतात.

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय! महत्वाचे परिपत्रक

Maha Pwd Recruitment 2023
Maha Pwd Recruitment 2023

महत्वाच्या तारखा

Maha Pwd Recruitment 2023 जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज  16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मागविण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट!
मनरेगा अंतर्गत 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे निवड!

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या सरळसेवा भरतीसाठी महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या प्रवेशपत्र व परीक्षा दिनांक बाबतची माहिती http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Previous Post Next Post