Shikshak Bharti TET Exam Update: सध्या राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, आता लवकरच उमेदवारांना आपले प्राधान्य क्रम नोंदवता येणार आहे, शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य आहे, याबाबत नुकतीच पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीमध्ये टीईटी परीक्षेची अट शिथिल करणेबाबत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक झाली, आता शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता (TET) परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत 25 ऑक्टोबर रोजी महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
$ads={1}
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!
राज्यातील प्रशिक्षीत पदवीधर वेतोन्नती देण्यात येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती दि. 13 फेब्रुवारी 2013 पूर्वीची असल्यास सदरची वेतोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची अट शिथिल करण्याबाबत 25 ऑक्टोबर 2023 रोजी एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. तसेच राज्यातील शिक्षक भरती संदर्भात 27 ऑक्टोबर रोजीच्या एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. (येथे पहा)
त्यानुसार आता अशा शिक्षकांना पदोन्नती/वेतोन्नती देताना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने त्या पदाकरीता विहीत शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वगळता पूर्ण केलेली असणे बंधनकारक असून, याचे पालन होईल याबाबतची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेबाबत महत्वाची बैठक संपन्न
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीमध्ये टीईटी परीक्षेची अट शिथिल करणेबाबत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आली आहे.
गुड न्यूज! शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
टीईटीची अट शिथिल करण्यात यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला (NCTE) पत्र द्यावे, अशा सूचना संबंधितांना मंत्री डॉ. गावित यांनी दिल्या. पेसा क्षेत्रातील उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी काही कालावधी देण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार करावा. तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल, असेही मंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले. अधिक वाचा..
$ads={2}
पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत बदल
शिक्षण सेवकाची भरती 'शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी' यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे.
शिक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक पहा
शिक्षक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध
दरम्यानच्या काळात, पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल, सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने, नव्याने तरतूदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सविस्तर वाचा..
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट!
अंगणवाडी भरती जाहिरात पहा
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु