Maha Teacher Recruitment 2023 : महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा

महाराष्ट्र राज्यातील रखडलेली शिक्षक भरतीला आता वेग आला असून, Maha Teacher Recruitment 2023 संदर्भात एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे, राज्यामध्ये दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून शिक्षक भरतीच्या जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, काय आहे शिक्षक भरती अपडेट सविस्तर पाहूया..

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात!

maha teacher recruitment

राज्यातील शिक्षकांची 32 हजार रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam) - 2022 चे आयोजन दि. 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर चाचणीस 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2 लाख 16 हजार 443 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. सदर परिक्षा दिलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टल (Pavitra Portal) वर त्यांचे पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.

आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून देण्यात आलेली आहे.

शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रम नोंदणी बाबत मोठी अपडेट!

शिक्षक भरती प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक

  1. दिनांक 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ‘पवित्र’ (Maha Teacher Recruitment) पोर्टल वर जाहिराती अपलोड करणे.
  2. दिनांक 15 नोव्हेंबरनंतर तीन आठवड्यात उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेणे.
  3. डिसेंबर 2023 अखेर ते 30 जानेवारी 2024 पर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नेमणुका देणे.

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना..

या प्रकरचे शिक्षक भरतीचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसून, या वेळेत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन

खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती असे दोन पर्याय आहेत. खाजगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद) मात्र मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक असणार आहे. अधिक वाचा.. (27 ऑक्टोबर 2023 रोजीचे परिपत्रक येथे पहा)

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!
गुड न्यूज! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा