Teacher Recruitment 2023 : राज्यातील 32 हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे, आता शिक्षक भरतीच्या नवीन अपडेट नुसार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी उमेदवारांसाठी नवीन सूचना काढण्यात आल्या आहेत.
शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना
राज्यामध्ये 32,000 रिक्त जागांसाठी शिक्षक भरती केली जात असून, मध्यंतरी रिक्त जागा बिंदू नमावलीचे कामकाज सुरू होते, त्यांनतर आता दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
आता दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या उमेदवारांसाठी नवीन सूचना काढण्यात आल्या आहेत, त्यामध्ये सन 2019 मधील शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत महत्वाच्या सूचना निर्गमित केल्या असून, उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करून लॉक करण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. (सूचना PDF लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)
शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रम नोंदणी बाबत मोठी अपडेट!
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, 'या' स्टेप्स फॉलो करा
$ads={1}
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam) - 2022 चे आयोजन दि. 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर चाचणीस 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2 लाख 16 हजार 443 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. सदर परिक्षा दिलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टल (Pavitra Portal) वर त्यांचे पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.
शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य आहे, याबाबत नुकतीच पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीमध्ये टीईटी परीक्षेची अट शिथिल करणेबाबत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक झाली, तसेच शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता (TET) परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत 25 ऑक्टोबर रोजी महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून देण्यात आलेली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!
सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर पालिका यांनी भरलेली आहे.
यापूर्वी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर PAVITRA- TEACHER RECRUITMENT-2017 साठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल व केवळ त्यांनाच लॉगीन उपलब्ध होईल. प्राधान्यक्रम Generate करून लॉक करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra@gmail.com या email वर संपर्क साधता येईल. (उमेदवारांसाठी सूचना सविस्तर येथे पहा)
$ads={2}
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु