CTET Registration 2023 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, 'या' स्टेप्स फॉलो करा

CTET Registration 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 18 व्या आवृत्तीची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET Exam 2024 जानेवारी सत्रासाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार CTET जानेवारी 2024 परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. CTET परीक्षेविषयी सविस्तर माहिती व नोंदणी कशी करावी? पाहूया.. 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु

CTET Registration 2023

CTET Exam Date 2024 : CTET परीक्षा रविवार, 21 जानेवारी 2024 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट पेपर-1 साठी सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत तर दुसरी शिफ्ट पेपर-II साठी दुपारी 2:00 ते 04 वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षेसाठी सविस्तर माहिती बुलेटिन, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहरे आणि CTET शी संबंधित इतर महत्त्वाची माहिती लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

CTET 2024 Eligibility : CTET पेपर 1 (इयत्ता 1 ते 5) प्राथमिक स्तर साठी मान्यताप्राप्त मंडळातून 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण व 2 वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा (Ded) किंवा 4 वर्षांचा B.El.Ed किंवा विशेष शिक्षणात डिप्लोमा (Spl Ded) असणे आवश्यक आहे.

पेपर 2: (इयत्ता 6 ते 8) उच्च प्राथमिक स्तर साठी प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमासह पदवी किंवा पदवीमध्ये 50% गुणांसह बीएड किंवा 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर 4 वर्षांचा बी.एड. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा पदवीनंतर, विशेष शिक्षणात बीएड (Spl Bed) पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://ncte.gov.in ला भेट द्यावी.

CTET 2024 Syllabus :  CTET देशभरातील 135 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. तथापि, मुख्य प्रश्नपत्रिका द्विभाषिक असेल - इंग्रजी आणि हिंदी, उमेदवारांना 20 पैकी दोन भाषा निवडाव्या लागतील त्यामध्ये इंग्रजी, गुजराती, मराठी, संस्कृत, हिंदी, कन्नड, मिझो, तमिळ, आसामी, खासी, नेपाळी, तेलगू, बंगाली, मल्याळम, ओरिया, तिबेटी, गारो, मणिपुरी, पंजाबी आणि उर्दू इ. भाषा असणार आहे. 

CBSE बोर्ड नुसार गणित आणि पर्यावरण अभ्यास पेपर विषयांच्या संकल्पना, समस्या सोडवण्याची क्षमता आणि शैक्षणिक समज आणि अनुप्रयोग यावर अभ्यासक्रम असणार आहे.  इयत्ता 1 ते 5 मधील NCERT पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जाणार आहेत.

प्रश्न पत्रिका स्वरूप : CTET परीक्षेत बालविकास आणि अध्यापनशास्त्र (अनिवार्य) 30 प्रश्न, भाषा I (अनिवार्य) 30 प्रश्न, भाषा II (अनिवार्य) 30 प्रश्न, गणित आणि विज्ञान 60 प्रश्न आणि सामाजिक अभ्यास/सामाजिक विज्ञान 60 प्रश्न असतील. एकूण 150 प्रश्नांचा पेपर असेल ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते, उमेदवारांनी याचा फायदा घेऊन प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.

अबब! या महिन्यात तब्बल 24 दिवसांची दिवाळी सुट्टी! यादी पहा
शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रम नोंदणी बाबत मोठी अपडेट!

CTET Registration 2024 - 'या' स्टेप्स करा फॉलो

CBSE CTET Registration 2023 - अर्ज कसा करावा?

  • स्टेप 1 अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
  • स्टेप 2 आता होमपेजवर, 'CTET Jan-24 Application' या लिंकवर क्लिक करा. 
  • स्टेप 3 आता नवीन पेज ओपन होईल. 
  • स्टेप 4 येथे विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज भरा. 
  • स्टेप 5 फी भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 
  • स्टेप 6 शेवटी सबमिट करा भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.

मनरेगा अंतर्गत नोकरीची संधी! - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये - नोंदणी येथे करा

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा