Mahajyoti Mpsc Registration 2023 : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये मिळणार, ऑनलाईन नोंदणी येथे करा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC अराजपत्रित गट 'ब' पदाच्या परीक्षेच्या तयारीसाठी महाज्योती (MAHAJYOTI) कडून विद्यार्थ्यांना एक रकमी 10,000 रुपये अर्थ सहाय्य देण्यात येते, याकरिता Mahajyoti Mpsc Registration 2023 सुरु झाले असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये मिळणार

Mahajyoti Mpsc Registration 2023

योजनेचे स्वरुप

महाराष्ट्र अराजत्रित गट 'ब' पुर्व परीक्षा 2023 उत्तीर्ण झालेल्या व महाराष्ट्र अराजत्रित गट ब मुख्य परिक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी पात्रता

  1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  2. विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती - भटक्या जमाती ती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
  3. विद्यार्थी हा महाराष्ट्र अराजत्रित गट ब पुर्व परीक्षा-2023 उत्तीर्ण झालेला असावा.
  4. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे. अश्या उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा प्रमाणपत्र
  • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र
  • बॅकेचे तपशील (बॅक पासबुक किंवा रद्द चेक)
  • महाराष्ट्र अराजत्रित गट 'ब' पूर्व परीक्षा-2023 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)

ऑनलाईन नोंदणी येथे करा

  • महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Maharashtra Non-Gazetted Group B (ASO, PSI, STI) Services - 2023 Main exam यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
  • अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

सविस्तर तपशील पहा
ऑनलाईन नोंदणी येथे करा - डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट - https://mahajyoti.org.in

Previous Post Next Post