Panvel Municipal Corporation Recruitment 2023 : उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....

Panvel Municipal Corporation Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध रिक्त पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे, विशेष म्हणजे  या जाहिरातीतील रिक्त जागा ह्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार म्हणजेच गुणांकन पद्धतीने थेट निवड करण्यात येणार आहे गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.  तुम्हीही या संधीचा अवश्य लाभ घेऊ शकता, त्यासाठी सविस्तर वाचा..

पनवेल महानगरपालिकामध्ये  उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या

Panvel Municipal Corporation Recruitment 2023

निवड प्रक्रिया

पनवेल महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागातील भरतीची उमेदवार निवड प्रक्रिया ही खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे.

  • सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या अर्जदारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार म्हणजेच गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • उमेदवाराची निवड शासनाच्या मार्गदर्शक निकषानुसार 1:3 व 1:5 याप्रमाणे उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. 
  • उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी, पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त अर्हता, अनुभव विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023
  • गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही.
  • समान गुण प्राप्त झाल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवारांचे गुणांकन (Merit) व वय देखील समान असेल तर अशा वेळी उमेदवाराचा संबंधित पदाशी निगडित अनुभव जास्त असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

राष्ट्रीय नागरी अभियान (NCM) अंतर्गत पनवेल महानगरपालिकेकरिता रिक्त पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयानुसार मंजुर पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात https://www.panvelcorporation.com या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर

त्यानुसार स्टाफ नर्स (स्री) (Staff Nurse Vacancy) 22 , स्टाफ नर्स (पुरुष) 05, आरोग्य सेविका 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05, आणि LHV 01 अशा एकूण 53 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना..
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!

पनवेल महानगरपालिका मूळ जाहिरात येथे पहा

महत्वाचे - सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील व त्यासाठी ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

मनरेगा अंतर्गत 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी!
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा