Diwali School Holiday 2023: गुड न्यूज! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, 21 ते 24 दिवस सुट्टी मिळणार

Diwali School Holiday 2023: यंदा दिवाळी 12 ऑक्टोबर 2023 रोजी असून, काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, नुकतीच सरकारने 15 नोव्हेंबर 2023 (भाऊबीज) ही सुट्टी जाहीर केली आहे, तसेच दीपावली सणाच्या तब्बल 21 ते 24 दिवस शाळांना सुट्टी मिळणार आहे, शाळांना दिवाळीची सुट्टी किती दिवसांची? असणार पाहूया..

राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

Diwali School Holiday 2023

दिवाळी हा सण वर्षभरातील सर्वात मोठा सण साजरा केला जातो. उन्हाळी सुट्टीनंतर सर्वात जास्त दिवस सुट्टी ही दिवाळी निमित्त विद्यार्थी तसेच नोकर वर्गाना मिळत असते.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टी अधिसूचनेनुसार नोव्हेंबर 2023 या महिन्यात दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 12 नोव्हेंबर 2023, दिवाळी (बलिप्रतिपदा) 14 नोव्हेंबर 2023, 15 नोव्हेंबर 2023 (भाऊबीज) गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर 2023 या सुट्या जाहीर केलेल्या आहेत, तसेच या महिन्यात 4 रविवार आणि 4 शनिवार (पाच दिवसाचा आठवडा) अशा एकूण 11 सार्वजनिक सुट्ट्या आणि दीपावली सणाच्या अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहे.

मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

राज्यामध्ये विविध विभागानुसार दिवाळी सणाच्या सुट्ट्या कमी जास्त मिळतात, कारण कोकणात गणपती उत्सव, तसेच विदर्भातील शाळा जून मध्ये उन्हाच्या तीव्रतेने उशिरा सुरु होतात, तसेच मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमानुसार शाळांच्या सुट्ट्या 1 ते 2 दिवस मागे पुढे असतात मात्र यंदा राज्यात 6 नोव्हेंबर पासून शाळांना काही जिल्हाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

जिल्हा परिषदेने शाळांना जाहीर केलेल्या सुट्यानुसार  बीड , परभणी, हिंगोली जिल्ह्यात 6 नोव्हेंबर पासून तर  जालना 9 नोव्हेंबर पासून दीपावलीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यातील संबंधित जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या सुट्ट्या ह्या 6 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे.

आरोग्य विभाग भरती 2023: परीक्षेचे वेळापत्रक पहा
विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

दिवाळी सणानंतर पुन्हा दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार व दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुनानक जयंती असल्याने, दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पासुन नियमित शाळा सुरू होणार आहेत. अशा एकूण जवळपास 21 ते 24 दिवसाची दीर्घ सुट्टी शाळांना मिळणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act 2009) मधील परिशिष्टामध्ये शालेय कामकाजाचे किमान दिवस व एकूण सुट्ट्या याचे सूत्र ठरविण्यात आले आहे, तसेच माध्यमिक शाळा संहिता 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. याची दक्षता घेण्याबाबत नमूद केले आहे. 

त्यानुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सुट्ट्या व शाळा पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय जिल्हास्तरावर ठरविण्यात येतात.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या अधिसूचना येथे पहा

जलसंपदा विभागात तब्बल 4,497 पदांसाठी मोठी भरती! - मनरेगा अंतर्गत नोकरीची संधी! - पनवेल महानगरपालिका जाहिरात पहा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post