Public Holiday : मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Public Holiday : आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून, १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. आता त्यानुसार नोव्हेंबर २०२३ मध्ये काही जिल्ह्यातील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

$ads={1}

मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Public Holiday

भारत निवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान छत्तीसगढ राज्यात मंगळवार, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२३ व शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी ; मध्यप्रदेश राज्यात शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी आणि तेलंगणा राज्यात गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी होणार आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेलगतचे जिल्हे खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे आहेत.

Public holiday

मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा विधानसभा राज्यांतील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी सरकारने आदेश काढले आहेत.

या महिन्यात तब्बल 24 दिवसांची दिवाळी सुट्टी! यादी पहा
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीची संधी!

त्यानुसार निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू असणार आहे. (सविस्तर शासन आदेश पहा)

Previous Post Next Post