NHM Bharti 2023 : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीची संधी! सविस्तर तपशील पाहा

NHM Bharti 2023 : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालय स्तरावरील विविध 18 पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 2 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहे.

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीची संधी!

nhm bharti 2023

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी कंत्राटी सेवा घेणे करिता जाहिरात http://nagarzp.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार विविध 18 पदांसाठी 28 पदे भरण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया : सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार, गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी, पदविका परोक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन करण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये - नोंदणी येथे करा

शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत विविध पदांसाठी इयत्ता 12 वी ते पदवीधर आणि संबंधित विषयातील कोर्स अहर्ता धारण केलेली असणे आवश्यक आहे. पदांचा तपशील व अहर्ता खालीलप्रमाणे

nhm bharti 2023

अबब! या महिन्यात तब्बल 24 दिवसांची दिवाळी सुट्टी! यादी पहा

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा आयुष रुग्णालय स्तरावरील कंत्राटी तत्वावर भरती करण्यात येत आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या अर्जासहित शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्षात (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दि.०२/११/२०२३ ते दि.१७/११/२०२३ रोजीच्या आत समक्ष किंवा पोस्टाने सादर करावेत. असे कळविण्यात आले आहे.

मूळ जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट : https://nagarzp.gov.in/

Previous Post Next Post