महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MGNREGA) योजनेअंतर्गत साधनव्यक्ती (Resource person) पदांसाठी 8 वी ते 10 वी पास इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये 100 जागा भरण्यात येणार असून, उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
$ads={1}
मनरेगा अंतर्गत 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 100 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित नमुन्यात स्वः हस्ताक्षरात भरून आवश्यक कागदपत्रांसह उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात दिनांक 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!
शिक्षक भरती संदर्भात मोठी अपडेट
- साधन व्यक्ती पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.
- साधन व्यक्ती पदासाठी उमेदवारचे किमान 18 वर्षे असावे. कमाल वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल. यासाठी कमाल शिक्षणाची मर्यादा नाही.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज सादर करावा.
$ads={2}
मूळ जाहिरात पहा
अर्जाचा नमुना येथे पहा
अधिकृत वेबसाईट - https://mahaegs.maharashtra.gov.in/
नोकरीची संधी! उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु