India Post Recruitment 2023: इंडिया पोस्ट विभागामध्ये विविध पदांसाठी तब्बल 1800+ रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली असून, 81,100 रुपये पर्यंत पगाराची नोकरीची संधी आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मैल गार्ड आणि मल्टीटास्किंग या पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे.
इंडिया पोस्ट विभागामध्ये विविध पदांच्या 1800+ रिक्त जागा, 10 वी पासही अर्ज करू शकतात, 81,100 रुपयांपर्यंत पगार
भारतीय टपाल विभागात (India Post Jobs) नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाने इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार DOPS Sports च्या dopsportsrecruitment.cept.gov या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.
इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 अंतर्गत पोस्टल सहाय्यक, शॉर्टनिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग पदांसाठी एकूण 1 हजार 899 रिक्त जागा भरल्या जात आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार 9 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यानंतर 10 ते 14 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे.
पदांचा तपशील
- पोस्टल असिस्टेंट - 598 पद
- शॉर्टिंग असिस्टेंट - 143 पद
- पोस्टमैन - 585 पद
- मैल गार्ड - 03 पद
- मल्टीटास्किंग - 570 पद
पदनिहाय वेतनश्रेणी (पगार)
- पोस्टल असिस्टेंट - 25,500 ते 81,100
- शॉर्टिंग असिस्टेंट - 25,500 ते 81,100
- पोस्टमैन - 21,700 ते 69,100
- मैल गार्ड - 21,700 ते 69,100
- मल्टीटास्किंग - 18,00 ते 56,900
आवश्यक पात्रता : 10 वी पास ते पदवीधर उमेदवार पोस्टल सेवा भरतीसाठी अर्ज करू शकतात. नंतरची शैक्षणिक पात्रता बदलते. सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे, तर केवळ MTS पदांसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे आहे. याशिवाय उमेदवाराने राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांमध्ये देशासाठी खेळलेला असावा. खेळ, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे) विभागनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे
अर्ज फी : अर्जाची फी 100 रुपये आहे. फी UPI, नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाइन भरता येते. तसेच महिला उमेदवार, ट्रान्सजेंडर उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
मूळ जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट - https://dopsportsrecruitment.cept.gov.in/
सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा
जिल्हा परिषद भरती परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक