सरकारी नोकरीची संधी! सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ (अराजपत्रित) ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यानुसार विविध 26 संवर्गातील पदे सरळसेवा भरतीने भरण्यात येत आहेत. यामध्ये तब्बल 1,8000 ते 1 लाख 77500 रु पर्यंत विविध पदांसाठी वेतनश्रेणी (पगार) आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

$ads={1}

सरकारी नोकरीची संधी! सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध 26 संवर्गातील पदे (Solapur Municipal Corporation Recruitment 2023) सरळसेवा भरतीने भरण्यात येत आहेत. यामध्ये तब्बल 226 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक - 10/11/2023 पासून
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 31/12/2023 पर्यंत
  • केंद्र प्रवेशपत्र (Hall Ticket) मिळण्याचे दिनांक - परीक्षा दिनांकाच्या सात दिवस आगोदर.
  • परीक्षेचा दिनांक - सोलापूर महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

पदांचा तपशील - एकूण विविध 26 संवर्गातील 226 जागा, पदांचे नाव खालीलप्रमाणे

पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी /अधीक्षक अग्निशामक दल, पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बाल विकास अधिकारी, समाजविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल), कनिष्ठ अभियंता (विद्युत), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट, मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, सुरक्षा रक्षक, फायरमन

सदर जाहीरातीद्वारे कळविण्यात आले आहे की, गट 'अ' ते गट 'ड' मधील एकूण 26 संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक10 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळांवर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या, आवश्यक शैक्षणिक अहर्ता याचा तपशील सविस्तरपणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर मूळ जाहिरात पहावी.

$ads={2}

मूळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट - https://www.solapurcorporation.gov.in/

Previous Post Next Post