Contract Employees Service Termination : कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती, विधानपरिषदेत तारांकित प्रश्न

Contract Employees Service Termination : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुख्यालयासह क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्याबाबत, मा. सदस्य श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

$ads={1}

बाह्ययंत्रणेतील सलग 9 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त, विधानपरिषदेत तारांकित प्रश्न

Contract Employees Service Termination

माननीय सदस्य श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी खालीलप्रमाणे प्रश्न उपस्थित केले होते.

(१) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या क्षेत्रिय कार्यालय व मंडळ मुख्यालयी ब्रिक्स इंडिया प्रा. लि. एजन्सी मार्फत कनिष्ठ लेखापाल, लिपिक टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई इत्यादी पदांवर कंत्राटी कर्मचारी सलग ९ वर्षांपासून कार्यरत असून, त्यांची सेवा दिनांक १८ जुलै, २०२३ रोजी वा त्यासुमारास समाप्त करण्यात आली असून, या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध पदांवर वेळो-वेळी कार्यालयातील प्रत्येक आदेशानुसार कार्यालयीन कामे तसेच कोविड कालखंडात खंड न पडता फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील लाखो बांधकाम कामगारांची मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेतंर्गत नोंदणी नुतनीकरण व लाभासंबंधी कामे, किट वाटप, आरोग्य तपासणी, मध्यान्ह भोजन योजना तसेच हजारो ऑनलाईन अर्जाची तपासणी करून पुढील कार्यवाही करीता कागदपत्रे तयार करणे इत्यादी कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दिनांक १८ जुलै, २०२३ रोजीच्या पत्रानुसार या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती करण्याचे निर्देश दिल्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आले असून वयोमर्यादा जास्त झाल्यामुळे नवीन नोकरी मिळणे कठिण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तथा निर्देश देवून कर्मचाऱ्यांना पुर्व पदावर कायम करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

महत्वाची बातमी! राज्यातील तासिका निदेशकांसाठी सरकारचा निर्णय!

सन्माननीय कामगार मंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी पुढीलप्रमाणे गोष्टींचा खुलासा केला आहे.

  1. उपरोक्त (१) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाकरीता ब्रिक्स इंडिया प्रा.लि यांचे मार्फत २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे मार्फत मंडळातील बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाचे प्राथमिक टप्यातील कामकाज करण्यात येत होते.
  2. उपरोक्त (२) होय, हे खरे आहे.
  3. उपरोक्त (३) दिनांक १८/०१/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मे, ब्रिक्स इंडिया प्रा.लि. या मनुष्यबळ पुरविण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेला देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आणण्यात आलेली आहे. 
  4. (४) प्रश्न उद्भवत नाही.
  5. (५) प्रश्न उद्भवत नाही.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न
कंत्राटी पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन, संदर्भात सरकारकडून खुलासा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा