Contractual Nurse Regularization : कंत्राटी आरोग्य सेविकांचे समायोजन करण्याबाबत - अतारांकित प्रश्न

Contractual Nurse Regularization : राज्यातील ग्रामीण भागात कंत्राटी आरोग्य सेविकांची सेवा खंडित न करता त्यांचे समायोजन करण्याबाबत माननीय सदस्य  श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री. सुरेश वरपुडकर (पाथरी), श्री. अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री. शिरीषकुमार नाईक (नवापूर), श्री. नानाभाऊ पटोले (साकोली) यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना सन्माननीय ग्रामविकास मंत्री यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.

$ads={1}

कंत्राटी आरोग्य सेविकांचे समायोजन करण्याबाबत - अतारांकित प्रश्न

Contractual Nurse Regularization

(१) राज्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात काम करणाऱ्या ५९७ कंत्राटी आरोग्यसेविकांची सेवा समाप्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?

(२) असल्यास, सदर कर्मचारी बेरोजगार होवून त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय?

(३) असल्यास, सदरहू प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीमध्ये काय आढळून आले तद्अनुषंगाने उक्त प्रकरणी कर्मचाऱ्यांना बेरोजगार न करता त्यांचे जिल्हयातील इतर पदांवर समायोजन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा येत आहे?

सन्माननीय ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी खालीलप्रमाणे खुलासा केला आहे.

उपरोक्त (१) हे खरे आहे. सन २०२२ - २०२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये मंजूरी न मिळालेल्या ५९७ ANM पदांच्या सेवा समाप्त करण्याबाबत सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.१८.१०.२०२२ च्या पत्रान्वये सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले होते.

उपरोक्त (२) व (३) आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या दि. २९.११.२०२२ च्या पत्रान्वये उपरोक्त ५९७ ANM पदांचे समायोजन करण्याबाबत तसेच दि. २०.०१.२०२३ च्या पत्रान्वये सदर ५९७ ए.एन.एम. पदांना केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाल्याने त्यांना रुजू करुन घेण्यात आले. असल्याचे अतारांकित प्रश्नावर मंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. (डाउनलोड करा)

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेजन करा - निरंजन डावखरे
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा