Contractual Teachers Regularization : राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेजन करा - निरंजन डावखरे

Contractual Teachers Regularization : राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी २५० आदर्श आश्रम शाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कला शिक्षकांचे समायोजन करावे, तसेच या कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्नांबाबत आ. निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) यांनी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन दिले असून, याबाबत मंत्री महोदयांनी याबाबत महत्वाचे सुतोवाच केले आहे.

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेजन करा - निरंजन डावखरे

Contractual Teachers Regularization

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, या शाळेमध्ये संगणक, कला, क्रीडा गेल्या ३ ते ४ शैक्षणिक वर्षांपासून राज्यभरात सुमारे १५०० कंत्राटी शिक्षक कार्यरत होते.

परंतु सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात त्यांना कामावरून कमी करण्यात आले. तेव्हा पूर्वीप्रमाणे कला, क्रीडा, संगणक शिक्षक यांना पुनर्नियुक्ती शासनाने द्यावी, यासाठी कंत्राटी कला, क्रीडा, संगणक कृती समितीकडून नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

नुकतेच राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी २५० आदर्श आश्रम शाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कला शिक्षकांचे समायोजन (Contractual Teachers Regularization) करावे, या मागणीसाठी आ. निरंजन डावखरे यांनी माननीय मंत्री आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी निवेदन करण्यात आले होते.

तसेच जोपर्यंत न्यायालयाची प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत राज्य सरकारकडून न्यायालयाला अंतिम आदेश येईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात मा. मंत्री श्री गावीत यांनी Tweet करून पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. याबाबत लवकरात लवकर विचारपूर्वक, योग्य निर्णय घेतला जाईल व निर्देश दिले जातील. तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा. या कंत्राटी कला शिक्षकांबरोबर न्याय केला जाईल व सर्वांसाठी योग्य असा निर्णय घेतला जाईल.

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये कंत्राटी संगणक शिक्षक, निर्देशक, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, कला, कार्यानुभव शिक्षक यांची नियुक्ती सन २०१८ साली झाली होती. कंत्राटी शिक्षक यांची नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार झाली असून, आजपर्यंत ३ वर्षां ऐवजी ४ वर्षे शासनात सेवा दिली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लेटेस्ट अपडेट पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा