SMC Recruitment 2023 Date Extended : सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील २६ विविध पदनामाचे २२६ पदभरती करण्यात येत आहे, आता या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा भरतीसाठी मुदतवाढ
सोलापूर महानगरपालिकेची विस्तृत जाहीरात व शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या २६ संवर्गाकरीता २२६ पदाकरीता अर्ज सादर करण्याकरीता अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत होती.
परंतु आता पुरेसा प्रतिसाद मिळणेकरीता सोलापूर महानगरपालिकाने काढलेल्या शुध्दिपत्रकान्वये सर्व पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी (Apply Online Last Date) अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ (SMC Recruitment 2023 Extended) देण्यात आली आहे.
या पदांसाठी सरळसेवा भरती
यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी /अधीक्षक अग्निशामक दल, पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बाल विकास अधिकारी, समाजविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल), कनिष्ठ अभियंता (विद्युत), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट, मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, सुरक्षा रक्षक, फायरमन इ.
विविध पदासाठी तब्बल 1,8000 ते 1 लाख 77500 रु पर्यंत विविध पदांसाठी वेतनश्रेणी (पगार) आहे.
मूळ जाहिरात PDF येथे डाउनलोड करा
सरकारी नोकरीची संधी! जाहिरात डाउनलोड करा
$ads={2}
या पदासाठी महानगरपालिकेमध्ये मोठी भरती