महत्वाची अपडेट! राज्यातील 'कृषी सेवक' भरती बाबत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर - Krushi Sevak Bharti 2024 Exam Date

Krushi Sevak Bharti 2023 Exam Date : कृषी सेवक भरती संदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट, राज्यामध्ये कृषी सेवकाची ९६० रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे, आता या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील कृषी सेवक भरती परीक्षा तारीख जाहीर

Krushi Sevak Bharti 2024 Exam Date

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक, लातूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)  विभागाच्या अधिनस्त असलेल्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची ९६० रिक्त पदे कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने स्पर्धा परिक्षेव्दारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले आहे.

कृषी सेवक पदांचा तपशील

  1. औरंगाबाद – 196
  2. नाशिक – 336
  3. लातूर – 170
  4. कोल्हापूर – 250

याबाबतची जाहिरात यापूर्वीच ऑगस्ट महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १४ सप्टेंबर २०२३ ते दि.३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

आता त्यानुषंगाने कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२४ (Krushi Sevak Bharti 2023 Exam Date) या कालावधीत राबविण्यात येणार आहे. 

तसेच शासन पत्र दि.१८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (Krushi Sevak Bharti 2023 Hall Ticket) यथावकाश आय.बी.पी.एस संस्थेकडून संबंधितांस उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा

सरकारी नोकरीची संधी! जाहिरात डाउनलोड करा

Krushi Sevak Bharti 2024 Exam Date

या पदासाठी महानगरपालिकेमध्ये मोठी भरती
सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते मंजूर

$ads={2}

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 'या' रिक्त पदांसाठी भरती सुरु
या विभागात 345 जागांसाठी जाहिरात

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा