7th Pay Commission Salary Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली 7 व्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते मंजूर करण्यात आले असून, डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते मंजूर
दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये बिम्स (BEAMS) प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत ७ व्या वेतन आयोगाचे १,२,३ हप्ते व वैद्यकीय देयके अदा करणेबाबत दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
डिसेंबर च्या पगारात मिळणार थकबाकीची रक्कम
सन २०२१-२२ मध्ये करावयाचा राहीलेला सातव्या वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला ३ रा हप्ता देखील अदा करणेबाबत कळविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय देयके (Medical Bills) ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे.
सातवा वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत देण्यात येणार आहे.
आनंदाची बातमी! राज्यातील अंगणवाडी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे दोन महत्वपूर्ण निर्णय!